ब्लॉगिंग म्हणजे काय आणि ब्लॉगमधून पैसे कसे कमवायचे | Blogging Tips in Marathi

ब्लॉगिंग म्हणजे काय, ब्लॉग कसा तयार केला जातो हे अनेकांना माहीत नाही?, या पोस्टमध्ये आपण याच विषयावर माहिती घेणार आहोत. यात आपण ब्लॉग तयार करणं किती सोपं आहे, हे सुद्धा ब्लॉगिंगच्या सिरीजमध्ये जाणून घेणार आहे. मित्रांनो, विद्यार्थीदशेत प्रत्येक विद्यार्थ्यांचं घरबसल्या, आपल्या मोकळ्या वेळात काहीतरी ऑनलाइन काम करून पैसे मिळवण्याचं स्वप्न असतं. आणि हेच स्वप्न आपण या ब्लॉगिंग च्या माध्यमातून पूर्ण करू शकतो.  

What is blogging in marathi

ऑनलाइन पैसे कमवण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे ब्लॉगिंग. काही मिनिटांत ब्लॉग वेबसाईट तयार करून त्यावर एफिलिएट मार्केटिंग करून आपण कमाई करू शकतो. यासह, आपण AdSense किंवा इतर Ad नेटवर्कच्या जाहिराती ब्लॉगवर लावून आणखी चांगले पैसे कमवू शकतो.

चला तर मग जाणून घेऊया ब्लॉग काय असतो? 

ब्लॉग म्हणजे काय? What is Blog in Marathi

ब्लॉग एक अशी वेबसाइट आहे, ज्यावर ब्लॉगर लोकांसाठी ज्ञान, माहिती शेअर करतात. आपले विचार आणि कल्पना लोकांसोबत शेअर करण्यासाठी ब्लॉग हे सर्वात लोकप्रिय प्लॅटफॉर्म आहे.  बातम्या, वैयक्तिक अनुभव, कार्यक्रम आणि माहिती प्रकाशित करण्यासाठी ब्लॉगचा वापर केला जातो. ब्लॉगमध्ये आपण लोकांसोबत व्हिडिओ, फोटोही शेअर करू शकतो.

स्वयं-होस्टेड(Self Hosted) प्लॅटफॉर्म किंवा इतर फ्री ब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर आपण  कोणत्याही विषयावर किंवा कीवर्डवर ब्लॉग तयार करू शकतो. ज्याद्वारे तुम्ही तुमचे विचार जगासोबत शेअर करू शकता. काही सर्वात लोकप्रिय ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म म्हणजे WordPress, Blogger.com, Tumblr.com, LiveJournal.com आणि Wix.com.

हा ब्लॉग नेमका काय आहे हे आतापर्यंत तुम्हाला समजले असेलच. आता आपल्याला ब्लॉगिंगच्या प्रकारांबद्दल देखील माहिती आहे.

ब्लॉगिंगचे प्रकार | Types Of Blogging in Marathi

ब्लॉगिंगचे दोन मुख्य प्रकार आहेत. ज्यामध्ये एक आहे पर्सनल ब्लॉगिंग आणि दुसरे प्रोफेशनल ब्लॉगिंग.

Personal Blogging :

Personal Blogging ला मराठीमध्ये वैयक्तिक ब्लॉगिंग म्हणतात. असे अनेक ब्लॉगर्स आहेत की ते ब्लॉगवर त्यांचे अनुभव शेअर करतात. ब्लॉगिंगमधून पैसे कमवणे हा त्यांचा उद्देश नाही. तो फक्त त्याच्या छंदासाठी ब्लॉगिंग करतो.  या प्रकारच्या ब्लॉगिंगला वैयक्तिक ब्लॉगिंग असे म्हटले जाते.

Professional-blogging (व्यावसायिक ब्लॉगिंग) :

व्यावसायिक ब्लॉगिंग(Professional Blogging) अशा ब्लॉगर्सद्वारे केली जाते ज्यांना त्यांच्या ब्लॉगमधून पैसे कमवायचे आहेत. बरेचशे असे ब्लॉगर्स ब्लॉगिंगला आपले करिअर बनवतात. हे ब्लॉगर्स त्यांच्या ब्लॉगकडे व्यावसायिक दृष्टिकोनातून पाहतात. आणि त्यातून ते पैसे कमावतात. 

आता हा प्रश्न तुमच्या मनात नक्कीच आला असेल की ब्लॉगिंग मधून आपण पैसे कसे कमवू शकतो?  चला तर मग त्याबद्दलही जाणून घेऊया.

ब्लॉगिंग मधून पैसे कसे कमवायचे.

जर ब्लॉगिंग योग्य प्रकारे केली तर ब्लॉगिंग हे तुमच्यासाठी करिअर देखील बनू शकते. चला तर मग जाणून घेऊया तुम्ही ब्लॉगिंग मधून पैसे कसे कमवू शकता. तुमच्या ब्लॉगवर जितके जास्त ट्रॅफिक, म्हणजेच जितके जास्त लोक तुमच्या ब्लॉगला भेट देतात तितके तुम्ही कमाई कराल.

ब्लॉगिंगमधून आपण अनेक प्रकारे पैसे कमवू शकतो. ब्लॉगिंगमधून पैसे कमवण्यासाठी आपल्यापैकी बहुतेक ब्लॉगर ज्या पद्धती वापरतात. त्याची माहिती आता मी तुम्हाला देणार आहे.

ब्लॉगमध्ये AdSense जाहिराती ठेवून

95% पेक्षा जास्त ब्लॉगर त्यांच्या ब्लॉगवर कमाई करण्यासाठी ही पद्धत वापरतात.

AdSense हे Google Advertising Platform आहे. जर तुम्ही तुमचा स्वतःचा ब्लॉग बनवला आणि तुमच्या ब्लॉगवर नियमित पोस्ट अपलोड केल्या. आणि त्याच वेळी तुम्ही लिहिलेल्या पोस्टमधील माहिती Unique ठेवली तर, त्या ब्लॉग वेबसाईट वर तुम्ही  AdSense कडून मंजूरी(Approval) मिळवून चांगली कमाई करू शकता.

तुम्हाला अ‍ॅडसेन्सची मान्यता न मिळाल्यास, तुम्ही अ‍ॅडसेन्स सारख्या इतर जाहिरात प्लॅटफॉर्मचा वापर करून कमाई करू शकता. जसे की Media.net, PropelerAds इ.

ब्लॉगवर Affiliate Marketing करून 

आजकाल सर्व ब्लॉगर्स, Youtubers तसेच अनेक लोक Affiliate Marketing ला आपले करियर बनवून दरमहा लाखो रुपये कमावत आहेत. तुम्हाला Affiliate Marketing मध्ये जास्त काम करण्याची गरज नसते. तुम्हाला फक्त  तुमच्या ब्लॉगवर फक्त काही उत्पादनांची लिंक जोडायची असते. (उदा., Amazon  वर किंवा इतर ईकॉमर्स वेबसाईटवर आपले Affilate अकाउंट तयार त्यावरून आपण प्रॉडक्ट्स च्या लिंक बनवू शकतो)

तुमच्या ब्लॉगला भेट देणार्‍या वाचकांकडून त्या लिंकवरून कोणत्याही वाचकाने ते उत्पादन विकत घेतले, तर तुम्हाला काही कमिशन मिळते. एफिलिएट मार्केटिंगचे देखील वेगवेगळे प्लॅटफॉर्म आहेत. ज्यामध्ये

  1. Amazon, Flipkart सारख्या ईकॉमर्स प्लॅटफॉर्मवर Affilate अकाउंट तयार करू शकतो.
  2. होस्टिंग/डोमेन विकणारे प्लॅटफॉर्मसुद्धा Affilate प्रोग्राममार्फत आपली सर्व्हिस विकत असतात, अशा वेबसाईटवर सुद्धा आपण Affilate अकॉउंट तयार करू शकतो.
  3. Clickbank, Digistore24 सारख्या आंतरराष्ट्रीय ईकॉमर्स प्लॅटफॉर्म वर Affilate अकाउंट आपण बनवू शकतो.
  4. ब्लॉगिंगसाठी लागणारे टूल्स, प्लगइन्स, थीम्सच्या Affilate प्रोग्रॅममध्ये आपण सहभागी होऊ शकतो.

आपल्या या वेबसाईट वर Affiliate Marketing संपूर्ण माहिती असणारी पोस्ट लवकरच अपलोड करण्यात येईल. त्या पोस्टची सूचना मिळवण्यासाठी आमच्या टेलिग्राम चॅनेलमध्ये सामील व्हा - Technical Aniket, Trends Hindi, Learn  More 

स्वतःच्या उत्पादनाची जाहिरात करून

तुम्ही तुमच्या ब्लॉगवर तुमचे स्वतःचे उत्पादन विकून कमाई करू शकता. तुमचे Physical Product असो किंवा Digital Product असो, तुम्ही या दोन्ही गोष्टी तुमच्या ब्लॉगला भेट देणाऱ्या वाचकांना विकू शकता.

तुम्ही तुमचा स्वतःचा कोर्स तयार करून तुम्ही त्या कोर्सेस ची विक्री ब्लॉगिंग मधून करू शकता. म्हणजेच  तुम्ही तुमच्या ब्लॉगवर त्या कोर्सेस चा प्रचार करू शकता. त्याचप्रमाणे, तुम्ही तुमचे स्वतःचे YouTube चॅनेल तयार करून आणि त्यावर व्हिडिओ अपलोड करून तुमच्या ब्लॉगवर त्यांची माहिती तुमच्या ब्लॉगवरील वाचकांपर्यन्त पोहोचवू शकता.

तुम्ही YouTube चॅनेल कसे बनवाल? आणि जर तुम्हाला Youtube वर विडिओ बनवून तुमचे यशस्वी करियर बनवायचे असेल, तर सतीश सरांच्या Complete  YouTube  Guide  हा कोर्स तुम्हाला खूप मदत करेल. कोर्समध्ये सहभागी होण्यासाठी पुढील  लिंकवर क्लिक करा. >>  Complete YouTube Guide Course Link <<

आतापर्यंत ब्लॉगिंगमधून पैसे कसे कमावले जातात याचीसुद्धा आपण बेसिक माहिती घेतली आहे . पण आपली  Earning वाढवण्यासाठी जास्तीत जास्त लोकांनी आपल्या ब्लॉग वेबसाईटला भेट दिली पाहिजे आणि ही ट्रॅफिक आपण आपल्या ब्लॉग वेबसाईटवर कशी वाढवू शकतो? याबद्दल आपण पुढील विषयात जाणून घेऊ.

ब्लॉगवर ट्रॅफिक कशी आणायची

जर आपल्याला आपल्या  ब्लॉगवर अधिक ट्रॅफिक आणायचे असेल, तर ट्रॅफिक वाढवण्यासाठी सर्वात महत्वाची बाब म्हणजे - तुम्ही तुमच्या ब्लॉग पोस्टचा SEO कसा केला आहे. यावर आपल्या  ब्लॉग वेबसाईटवर organic traffic किती येत आहे, हे ठरत असते.

SEO म्हणजे सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन. जर तुमच्या पोस्टचा SEO उत्कृष्ट असेल तर तुमची पोस्ट गुगल सर्चमध्ये रँक करेल. आणि तिथून चांगली ऑरगॅनिक ट्रॅफिक तुमच्या ब्लॉगवर येईल.

तुम्ही तुमच्या ब्लॉग पोस्टची लिंक तुमच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर करून तेथून तुमच्या ब्लॉगवर ट्रॅफिक आणू शकता.

या पोस्टमध्ये आपण ब्लॉगची प्राथमिक माहिती जाणून घेतली आहे. अशा नवीन विषयांची माहिती आम्ही आमच्या वेबसाईटवर आणतो. कॉम्प्युटर, टेक्नॉलॉजी, शेअर मार्केट यासंबंधी कोणत्याही विषयावर माहिती हवी असल्यास. तुम्ही त्याला कमेंट करून सांगू शकता. आम्ही शक्य तितक्या लवकर त्या विषयावरील पोस्ट अपलोड करू. 

ब्लॉगिंगशी संबंधित ही पोस्ट जरूर वाचा -

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form