सॉफ्टवेअर म्हणजे काय | What is Software in Marathi

मित्रांनो, या अगोदरही कदाचित तुम्ही सॉफ्टवेयर (Software) हा शब्द ऐकला असेल, तुम्हाला माहित आहे का हे सॉफ्टवेअर म्हणजे नेमकं काय? what is software in marathi. या पोस्टमध्ये आपण याच सॉफ्टवेअर बद्दल चर्चा करणार आहोत. सॉफ्टवेअरबद्दलची अधिक माहिती जाणून घेणार आहोत. ज्यामध्ये 

  1. सॉफ्टवेअर म्हणजे काय । what is software in marathi 
  2. सॉफ्टवेअरचे प्रकार कोणकोणते आहेत । Types of Software in Marathi
  3. आपण दैनंदिन जीवनात वापरत असलेले सॉफ्टवेअर 
  4. सॉफ्टवेअरचा वापर कुठे केला जातो । Applications of Software in Marathi 

आपण वापरत असलेले संगणक (Computer) किंवा लॅपटॉप हे हार्डवेअर(Hardware) आणि सॉफ्टवेअरने(Software) बनलेले आहेत. संगणकाच्या सर्व हार्डवेअरच्या आउटपुटवर सॉफ्टवेअरच्या मदतीने प्रक्रिया केल्याने आपल्याला स्क्रीनवर जे पाहिजे असेल ते आउटपुट मिळत असते. त्याच वेळी, हार्डवेअर चांगले काम करण्यासाठी सॉफ्टवेअरच्या मदतीने ते हार्डवेअर नियंत्रितसुद्धा केले जाते.

याचा अर्थ हाच होतो कि, संगणक वापरण्यासाठी सॉफ्टवेअर आवश्यक आहे. आपण जे काही काम संगणकाद्वारे केले असते, ते काम आपण कोणत्या ना कोणत्या सॉफ्टवेअरच्या मदतीने करत असतो. संगणकातील हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर एकमेकांवर अवलंबून असतात. मित्रांनो, ज्यादातर आपण कॉम्प्युटर या शब्दाचा वापर दैनंदिन जीवनात करत असतो, मला खात्री आहे कि कॉम्प्युटरला मराठीमध्ये "संगणक" असे म्हणतात, हे तुम्हाला माहीतच असेल. तर चला मग आपण Software बद्दल अधिक माहिती घेऊ. [Information of Software in Marathi]

सॉफ्टवेअर म्हणजे काय । What is Software in Marathi 

कॉम्प्युटर स्वत: कोणतेही काम करत नाही, त्यासाठी संगणक आपण दिलेल्या सूचनांवर म्हणजेच निर्देशांवर प्रक्रिया करतो. यासाठी तो संगणकीय भाषा (Computer Language) वापरतो. सॉफ्टवेअर हा एक असा प्रोग्राम आहे जो कोणत्याही प्रकारचे काम करताना संगणकाला आवश्यक असलेल्या सूचना संग्रहित करतो. आणि त्या सूचनांवर प्रक्रिया करून ते कार्य पूर्ण करतो. संगणकावरील सर्व कामे आपण सॉफ्टवेअरच्या मदतीने करू शकतो. सॉफ्टवेअरशिवाय संगणक अपूर्ण आहे.

सॉफ्टवेअरचे प्रकार | Types of Software in Marathi 

संगणकाच्या कार्यानुसार, संगणकामध्ये तीन मुख्य प्रकारचे सॉफ्टवेअर असतात. त्यात

  • सिस्टम सॉफ्टवेअर (System Software)
  • ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर (Application Software)
  • युटिलिटी सॉफ्टवेअर (Utility Software)

चला तर मग जाणून घेऊया या सर्व प्रकारांबद्दल.

सिस्टम सॉफ्टवेअर (System Software)

सिस्टम सॉफ्टवेअर हे एकापेक्षा जास्त प्रोग्रॅमचे बनलेले असते. या सॉफ्टवेअरद्वारे आपण संगणकाचे हार्डवेअर नियंत्रित करू शकतो.

खालील कार्ये सिस्टम सॉफ्टवेअरद्वारे केली जातात.

  1. हे सॉफ्टवेअर वापरकर्ता आणि संगणकाच्या हार्डवेअरमध्ये इंटरफेस तयार करते.
  2. संगणक नियंत्रित करण्याचे काम सिस्टम सॉफ्टवेअरद्वारे केले जाते.
  3. नवीन हार्डवेअरच्या कनेक्टिव्हिटीसाठी सपोर्ट सिस्टम सॉफ्टवेअरचा वापर केला जातो.
  4. अँप्लिकेशन सॉफ्टवेअर (Application Software) कार्यान्वित करण्यासाठी प्लॅटफॉर्म प्रदान करते.
  5. संगणकाच्या देखभालीचे कामही सिस्टम सॉफ्टवेअर करते.

हे काही सिस्टम सॉफ्टवेअर आहे.

  • विंडोज एक्सपी (Windows xp)
  • विंडोज 7 (Windows 7)
  • विंडोज 8 (Windows 8)
  • मॅक ओएस (Mac OS)
  • लिनक्स (Linux)
  • युनिक्स (Unix)

वर दिलेल्या या सर्व सॉफ्टवेअरला ऑपरेटिंग सिस्टम(Operating system) असेही म्हणतात.

ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर (Application Software)

आपण सामान्यतः जे सॉफ्टवेअर वापरतो ते सॉफ्टवेअर अँप्लिकेशन सॉफ्टवेअरमध्ये (application software) येते.  Photoshop, CorelDraw, Tally, MsOffice इत्यादी ही सॉफ्टवेअर्स Application Software आहेत.

हे असे सॉफ्टवेअर आहे, जे आपण आपल्या गरजेनुसार आणि विशेष कार्यांसाठी वापरतो.

खालील सर्व ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर्स (Application Software) आहेत.

  • मायक्रोसॉफ्ट ऑफिस (Microsoft Office)
  • अडोब फोटोशाॅप (Adobe Photoshop)
  • ऑडासिटी (Audacity)
  • व्हिज्युअल स्टुडिओ (Visual Studio Code)
  • VLC मीडिया प्लेयर (VLC Media Player)
  • जेट ऑडिओ (Jet Audio)
  • पिकासा (Picasa)
  • गुगल क्रोम (Google Chrome)
  • टॅली (Tally)

युटिलिटी सॉफ्टवेअर (Utility Software)

हे असे प्रोग्राम सॉफ्टवेअर आहे जे आपल्याला पुन्हा पुन्हा आवश्यक असते. युटिलिटी प्रोग्राम्स अशी अनेक कामे करतात, जी संगणक वापरताना करावी लागतात. अशाप्रकाराच्या सॉफ्टवेअर प्रोग्रामचा संपर्क थेट हार्डवेअरशी असतो. डिस्क डीफ्रॅगमेंटर, अँटी व्हायरस इत्यादी Utility Software's आहेत.

युटिलिटी सॉफ्टवेअर ही एक संगणक प्रणाली आहे जी संगणकाचे विश्लेषण, कॉन्फिगरेशन, ऑप्टिमायझेशन आणि देखभाल करण्यास मदत करते.

खालील सर्व Utility Software's आहेत.

  • Antivirus (अँटीव्हायरस)
  • Backup software ( बॅकअप सॉफ्टवेअर )
  • Clipboard (क्लिपबोर्ड)
  • Compression utility (कॉम्प्रेशन युटिलिटी)
  • Cryptography software (क्रिप्टोग्राफी सॉफ्टवेअर)
  • Debuggers (डीबगर)
  • Defrag (डीफ्रॅग)
  • DirectX (डायरेक्टएक्स)
  • Disk checkers (e.g., Defrag, Disk Cleanup, and ScanDisk). (डिस्क चेकर (उदा., डीफ्रॅग, डिस्क क्लीनअप आणि स्कॅनडिस्क).
  • Disk partition editors

मित्रांनो, या पोस्टमध्ये आपण सॉफ्टवेअर म्हणजे काय |  What is Software in Marathi याची माहिती घेतली आहे.  यासोबतच, आपण सिस्टम सॉफ्टवेअर (System Software in Marathi),  ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर (Application Software in Marathi) आणि युटिलिटी सॉफ्टवेअर(Utility Software in  Marathi) बद्दल देखील माहिती घेतली आहे.

कॉम्प्युटर शिकायचा असेल तर चला सतीश सरांकडे कॉम्प्युटर शिकूया. येथे क्लिक करून आता सतीश सरांच्या कोर्समध्ये सामील व्हा.

मराठी कोर्सेस वेबसाईट - https://mazacourse.com/

हिंदी कोर्सेस वेबसाईट - https://learnmorepro.com/all-courses/

विडिओ पहा : 


Tech Shala - टेक शाळा युट्युब चॅनेल लिंक - https://www.youtube.com/channel/UC6UnjTB8hedM_YBD75cNYDg

Mazi Marathi - माझी मराठी युट्युब चॅनेल लिंक - https://www.youtube.com/channel/UCHknKeOoEOl19ksnO02-ZQA


Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form