यूट्यूब बद्दल महत्त्वपूर्ण माहिती | Important information about YouTube in Marathi

 


YouTube  जगातील सर्वोत्कृष्ट व्हिडिओ प्लॅटफॉर्म आहे.

सध्याच्या काळात युट्युब सगळ्यांनाच माहिती आहे. लहान असो किंवा मोठा प्रत्येकजण युट्युबचा वापर आपल्या मनोरंजनासाठी करत आहे. एवढेंच नाही तर आपल्याला कोणत्याही विषयाची माहिती हवी असेल ते  YouTube वर सर्च करून आपण त्या विषयाबद्दल माहिती मिळवू शकतो.  शिक्षण क्षेत्र, मनोरंजन, पर्यटन या पाककृतींची माहिती, शैक्षणिक माहिती, तसेच इतर बऱ्याचशा विषयाबद्दल माहिती यूट्यूबवर व्हिडीओच्या माध्यमात उपलब्ध आहे.

या पोस्टमध्ये आपण YouTube बद्दल माहिती आणि काही फॅक्टस जाणून घेणार आहोत. (YouTube information in Marathi )

यूट्यूब बद्दल महत्त्वपूर्ण माहिती | Important information about YouTube in Marathi 

YouTube ची स्थापना कधी झाली?

YouTube ची स्थापना 14 फेब्रुवारी 2005 रोजी झाली.

YouTube चे संस्थापक कोण आहेत?

स्टीव्ह चेन, जावेद करीम आणि चाड हर्ले हे YouTube चे संस्थापक आहेत.

YouTube चे पहिले कार्यालय कुठे होते?

YouTube चे पहिले कार्यालय सॅन माटेओ, कॅलिफोर्निया येथील पिझ्झेरिया आणि जपानी रेस्टॉरंटच्या वर स्थित होते.

YouTube चे मुख्यालय कोठे आहे?

2010 मध्ये, YouTube ने त्याचे कार्यालय सॅन ब्रुनो येथे हलवले.

YouTube वर पहिला व्हिडिओ कोणी अपलोड केला?

जावेद करीम यांनी YouTube वर पहिला व्हिडिओ अपलोड केला. जावेद करीम हे YouTube चे सह-संस्थापक आहेत.

YouTube वर अपलोड केलेला पहिला व्हिडिओ कोणता आहे?

जावेद करीम यांनी प्राणिसंग्रहालय पाहण्यासाठी गेले होते. त्यानंतर त्यांनी पहिला व्हिडिओ YouTube वर अपलोड केला. पहिला व्हिडिओ 23 एप्रिल 2005 रोजी रात्री 8:27 वाजता YouTube वर अपलोड करण्यात आला. त्याने या व्हिडिओला “Me At the Zoo” असे नाव दिले. YouTube वरील विडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा व्हिडिओ पहा.

मोबाईल व्हर्जनमध्ये यूट्यूब कधी लाँच झाले?

यूट्यूबने 15 जून 2007 रोजी मोबाइल आवृत्तीमध्ये वेबसाइट लाँच केली.

 YouTube भारतात कधी सुरू झाले?

2008 मध्ये YouTube लाँच करण्यात आले.

Google ने YouTube कधी विकत घेतले?

Google ने 13 नोव्हेंबर 2006 रोजी YouTube विकत घेतले.

YouTube किती भाषांमध्ये उपलब्ध आहे?

YouTube जगातील 80 पेक्षा जास्त भाषांमध्ये उपलब्ध आहे.

YouTube किती देशांमध्ये उपलब्ध आहे?

YouTube सेवा 100 हून अधिक देशांमध्ये उपलब्ध आहे.

यूट्यूबवर किती तासांचे व्हिडिओ अपलोड करता येतात?

सामान्यत: 15 मिनिटांचा व्हिडिओ YouTube वर अपलोड केला जाऊ शकतो. परंतु Verify झालेल्या YouTube चॅनेलवर 12 तासांपर्यंतचा व्हिडिओ अपलोड केला जाऊ शकतो.

YouTube वर अपलोड करण्‍यासाठी व्हिडिओचा आकार किती असावा?

तुम्ही YouTube वर २५६ गीगाबाइट्स (२५६ जीबी) पर्यंतचे व्हिडिओ अपलोड करू शकता.

मित्रांनो, हि आहे YouTube विषयीची काही बेसिक माहीती. जर तुम्हाला इतर कुठल्याही अँप्लिकेशनची माहिती पाहिजे असेल तर तुम्ही आम्हाला कमेंटद्वारे कळवू शकता. लवकरात लवकर आम्ही त्या अँप्लिकेशन्स विषयी माहिती mazimarathi वर अपलोड करण्याचा प्रयत्न करू. 

 YouTube वर व्हिडिओ अपलोड करून खुपजण घरबसल्या ऑनलाईन पैसे कमावत आहेत. तुम्हालाही युट्युबवर विडिओ अपलोड करून ऑनलाईन पैसे कसे कमवायचे हे जर तुम्हाला शिकायचे असतील तर तुम्ही सतीश सरांच्या कोर्सला जॉईन होऊन युट्युबद्वारे पैसे कमावू शकता. 

कोर्स करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा. >> YouTube Full Course in Hindi 

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form