संगणकाच्या महत्वाच्या 10 शॉर्टकट कीज बद्दल माहिती | Computer 10 Basic Shortcut Keys in Marathi

संगणकाच्या महत्वाच्या 10 शॉर्टकट कीज बद्दल माहिती | Computer 10 Basic Shortcut Keys in Marathi 

मित्रांनो, सध्याच्या काळात कॉम्युटरला किती महत्व आहे हे तुम्हाला सांगण्याची काहीच गरज नाहीये. कारण आपण दररोज आपल्या सभोवताली कॉम्प्युटर ला पाहत आहोत. त्याद्वारे होणाऱ्या कामांना अनुभवत आहोत. आणि आपल्यातल्या बऱ्याच जणांना तर कॉम्प्युटर चांगल्या पद्धतीने चालवताही येत असेल. तुम्हाला माहीतच असेल कि कॉम्प्युटरचे मुख्यतः चार पार्टस मध्ये विभाजन होते. त्यात इनपुट, आउटपुट, प्रोसेसिंग युनिट आणि स्टोरेज डिव्हाइसेस. हे सगळे डिव्हाईसेस मिळून एक परिपूर्ण कॉम्प्युटर ज्यालाच मराठीमध्ये संगणक म्हटले जाते. 

यातीलच इनपुट डिव्हाइसेस चा सर्वात महत्वाचे डिवाइस म्हणजे कीबोर्ड. ज्याद्वारे आपण कॉम्प्युटरला काहि निर्देश देऊ शकतो. हा ब्लॉग मी टाईप करू शकलोय, तो हि कीबोर्डच्याच मदतीने. बरेच जण या कीबोर्डचा वापर करून कॉप्युटर चालवतात. पण तुम्ही खरंच या कीबोर्डचा स्मार्ट पद्धतीने वापर करताय का? हा एकदा आपल्या मनाला प्रश्न विचारायला हवा. कीबोर्डचा स्मार्ट पद्धतीने वापर करायचा म्हंणजे कॉम्प्युटर वापरताना कीबोर्डच्या काही शॉर्टकट कीज चा वापर. आणि तो वापर करण्यासाठी तुम्हाला कॉम्प्युटर शॉर्टकट कीज बद्दल माहिती असणे आवश्यक आहे. खाली आम्ही अशा काही बेसिक शॉर्टकट कीज (Computer Basic Shortcut Keys) बद्दल माहिती  दिली आहे.  ज्या तुमचे काम जलद आणि स्मार्ट बनवतील. चला तर मग जाणून घेऊयात कि त्या शॉर्टकट कीज नेमक्या कोणत्या आहेत.

खाली दिलेल्या 10 शॉर्टकट कीज(Shortcut keys) संगणक वापरताना सर्वात उपयुक्त आहेत.

या 10 कीबोर्ड शॉर्टकट की प्रत्येकाला माहित असणे आवश्यक आहे । Everyone needs to know these 10 keyboard shortcut keys

1. CTRL + C आणि CTRL + insert - Copy 

या दोन्ही शॉर्टकट कीज निवडलेल्या मजकूर किंवा फाइल कॉपी करण्यासाठी वापरू शकता .

2. CTRL + V - Paste

ही शॉर्टकट कीज वापर, तुमचा वापर कॉपी केलेला मजकूर किंवा फाइल पेस्ट करण्यासाठी केला जातो.

3. CTRL + X - Cut

एका ठिकाणचा मजकूर काढून तो दुसऱ्या ठिकाणी पेस्ट करण्यासाठी तुम्ही CTRL + X हि शॉर्टकट कीज वापरु शकता. अजून या शॉर्टकट कीजचा वापर करून फाईल एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थानांतर देखील करू शकता.

4. CTRL + Z आणि CTRL + Y - Undo Or Redo 

या शॉर्टकट कीजचा वापर शेवटची क्रिया एका पायरीने पुढे किंवा मागे घेण्यासाठी केला जातो.

   >> CTRL + Z (Undo) – शेवटी जी क्रिया केली आहे तिला परत मागे घेण्यासाठी या शॉर्टकट कीजचा वापर केला जातो. 

   >> CTRL + Y (Redo)- या शॉर्टकट कीजचा वापर करून आपण पुन्हा मागील कृतीवर जाऊ शकतो.

5. Windows + R - Open Run Command Prompt 

या शॉर्टकट कीज एकाच वेळी दाबल्याने Run कमांड उघडते.

6. CTRL + A - Select All 

या शॉर्टकट कीज सर्व मजकूर फायलींमधील सामग्री किंवा फाइल्स एकत्रितपणे निवडण्यासाठी म्हणजेच सिलेक्ट करण्यासाठी वापरली जाते.

7. CTRL + S - Save 

या शॉर्टकट कीजचा वापर कोणतीही फाइल किंवा ऑपरेशन सेव्ह करण्यासाठी केला जातो.

8. Alt + Tab - Switch Between Open Programs 

जेव्हा संगणकात एकापेक्षा जास्त प्रोग्राम उघडलेले असतात. आणि मग तुम्हाला एका प्रोग्रॅमवरून दुसऱ्या प्रोग्रामवर स्विच करायचे असेल तर या शॉर्टकट कीज चा वापर केला जातो.

9. Shift + Delete - Permanent Delete  

कॉम्प्युटरमधून कोणतीही फाईल किंवा फोल्डर कायमचे डिलीट करायचे असेल तर या शॉर्टकट कीज चा वापर केला जातो.

10. Alt + F4 - Shutdown Windows

या शॉर्टकट कीज चा वापर करून आपण संगणक बंद , रिस्टार्ट, स्विच ऑफ करू शकतो.

कॉम्प्युटरच्या महत्वाच्या या दहा शॉर्टकट कीज नक्कीच प्रत्येक कॉम्प्युटर युजर्ससाठी फायद्याच्या आहेत. प्रत्येक कॉम्प्युटर युजर आपले कॉम्प्युटर चालू केल्यांनतर यातील एक तरी ऑपेरेशन एकदा तरी वापरतो. पण बरेचजण यासाठी माऊसचा वापर करत असतात. यासाठी ते आपला बराच वेळ वायला घालवत असतात. मला नक्कीच खात्री आहे कि, हि पोस्ट वाचल्यानंतर माझी मराठीवरील प्रत्येक वाचक आता या शॉर्टकट कीजचा वापर करून कॉम्प्युटरच्या कीबोर्डचा स्मार्ट पद्धतीने वापर करेल.

👨🏻‍💻 फ्रीमध्ये घरबसल्या कॉम्प्युटर शिका..

कॉम्प्युटर सध्या काळाची गरज बनले आहे. अशातच प्रत्येकाला कॉम्प्युटर ऑपरेट करता येतं असं नाही. बऱ्याच जणांना तर कॉम्प्युटर च्या भागांची सुद्धा नावे सांगता येत नाही. 

म्हणूनच 🚩 माझीमराठीडॉटकॉम वर पोस्टमध्ये आम्ही तुम्हाला कॉम्प्युटरचा फ्री कोर्स कसा करायचा याची माहिती देणार आहोत.

💁🏻‍♀️ हा कोर्स कोण कोण करू शकतात ?

हा कोर्स लहानापासून मोठ्यांपर्यंत सगळेच करू शकतात.

💁🏻‍♀️ कोर्स करण्यासाठी फी किती आहे ?

हा कोर्स अगदी मोफत आहे. हा कोर्स करण्यासाठी तुम्हाला तुमच्या खिशातून रुपयाही खर्च करायची गरज नाही.

💁🏻‍♀️ अधिक माहिती घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करून पूर्ण पोस्ट वाचा..

https://www.mazimarathi.com/2022/03/Full-Basic-Computer-Course-in-Marathi.html

🎊 या फ्री कोर्सची माहिती जास्तीत जास्त मुलापर्यंत शेअर करा.


Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form