स्मार्टफोनचा बॅटरी बॅकअप वाढवण्यासाठी टिप्स । Tips for increasing smartphone battery backup in Marathi

स्मार्टफोनचा बॅटरी बॅकअप वाढवण्यासाठी टिप्स | Tips for increasing smartphone battery backup in Marathi 

tips for increasing mobile battery backup in marathi

मित्रांनो, सध्या प्रत्येकाकडे स्मार्टफोन आहे अगदी पहिली दुसरीच्या मुलापासून सगळेच स्मार्टफोन्सचा वापर करत आहेत. स्मार्टफोन्स कितीवेळ चालू शकेल हे ठरते त्या स्मार्टफोन्सच्या बॅटरी कॅपॅसिटीवर(Battery Capacity)... स्मार्टफोनला विकत घेऊन जास्त काळ झाल्यानंतर जर आपल्या मोबाईलची बॅटरी म्हणावा असा परफॉर्मन्स देत नसेल तर आपण म्हणतो कि, आपल्या मोबाईलच्या बॅटरीचा बॅकअप(Battery Backup) कमी झालाय.  मग हा बॅटरी बॅकअप नेमका कशामुळे कमी होतो? आणि हे होऊन न देण्यासाठी कोणकोणत्या गोष्टी करायला पाहिजे हे आपण या पोस्टमध्ये जाणून घेणार आहोत.

 या डिजिटल युगात प्रत्येक माणसाकडे मोबाईल फोन आहे.  छोटा असो वा मोठा, स्मार्टफोन वापरत असतो.  मोबाईल (स्मार्टफोन) ही प्रत्येक माणसाची गरज बनली आहे.  लोक या स्मार्टफोनच्या मदतीने वेगवेगळी कामे किंवा त्यांच्या मनोरंजनासाठी करतात.  या सर्वांसाठी मोबाईलची बॅटरी चांगली असावी,  आपल्या मोबाईलचा बॅटरी बॅकअप (battery backup mobile) चांगला असावा, असे प्रत्येकाला वाटते.  पण तुम्हाला माहीत आहे का?  की आपण आपला स्मार्टफोन चार्ज करताना काही छोट्या चुका करतो [Mistakes Done By Every Smartphone User while Mobile Charging].  त्यामुळे आपल्या स्मार्टफोनचा बॅटरी बॅकअप कमी होतो.

 स्मार्टफोनचा योग्य वापर केल्यास त्याचा बॅटरी बॅकअपही वाढवता येतो.  या पोस्टमध्ये, आपण आपल्या स्मार्टफोनचा बॅटरी बॅकअप कसा वाढवू शकतो हे जाणून घेणार आहोत.

 स्मार्टफोनचा बॅटरी बॅकअप वाढवण्यासाठी टिप्स [ Tips for increasing smartphone battery backup in Marathi ]

१.  स्मार्टफोनला चार्ज करताना स्मार्टफोन्सचा वापर करू नका.

 स्मार्टफोन चार्ज करताना जर तुम्ही तुमच्या स्मार्टफोनवर काही काम करत असाल तर त्यावेळेस आपल्या मोबाईलमध्ये बॅकग्राऊंडला खुप सारे ऑपरेशन्स होत असतात. त्यावेळेस आपल्या मोबाईलमध्ये खूप जास्त बॅटरी पॉवरचा वापर केला जातो. सोबतच इतरही काही बॅकग्राऊंड ऑपरेशन्स आपल्या मोबाईलमध्ये होत असतात. म्हणजेच जर इंटरनेट चालू असेल आणि अँप्ससाठी ऑटोअपडेट्स चालू असेल असे काही ऑपरेशन्स. यातहि काही प्रमाणात मोबाईलच्या बॅटरीचा वापर होतो. यामुळे स्मार्टफोनच्या बॅटरीचे आयुष्यही कमी होते.

२.  स्मार्टफोन जलद चार्ज करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे फास्ट चार्जिंग अँप्लिकेशन वापरू नका.

जर तुम्ही तुमच्या स्मार्टफोनची बॅटरी वाचवायची असेल किंवा स्मार्टफोनच्या चार्जिंगला गती देण्यासाठी कोणतेही थर्ड-पार्टी फास्ट चार्जिंग अँप किंवा बॅटरी सेव्हर(battery saver app) वापरत असाल, तेव्हा स्मार्टफोन चार्ज करतानाही हे अँप्लिकेशन बॅकग्राउंडमध्ये चालू असते.  तुम्ही मोबाईलला स्लीप मोडवर ठेवून चार्ज करत असाल तरीही हे अँप्लिकेशन त्यांचे कार्य चालू ठेवतात.

[ हेही वाचा - सॉफ्टवेअर म्हणजे काय | What is Software in Marathi ]

३.  बॅटरी 20% (20 टक्के) पेक्षा कमी झाल्यावरच स्मार्टफोन चार्ज करा.

आपण कोणत्याही प्रकारची बॅटरी जितक्या जास्त वेळा चार्ज करू तितके त्या बॅटरीचे आयुष्य किंवा बॅकअप कमी होत राहील.  स्मार्टफोनच्या बॅटरीसाठीही हेच आहे.  तुमच्या मोबाईलची बॅटरी थोडी कमी झाल्यावर लगेच मोबाईल चार्ज केला तर त्याचा परिणाम तुमच्या मोबाईलच्या बॅटरीवर होतो. आणि आपल्या मोबाईलची बॅटरी लवकरच खराब होण्याची शक्यता जास्त असते.

 ४.  स्मार्टफोन चार्ज करताना त्याचे कवर (mobile case) काढून टाका.

 जर तुम्ही तुमचा स्मार्टफोन चार्जिंगसाठी कव्हरसोबत ठेवलात तर काही वेळा चार्जर मोबाईलला नीट कनेक्ट होत नाही, त्यामुळे मोबाईलची बॅटरी खराब होण्याचीही शक्यता असते.  काही वेळा मोबाईलचे तापमानही वाढते.

 ५.  स्मार्टफोन चार्ज करण्यासाठी, ओरिजिनल चार्जर अडाप्टर आणि केबल वापरा.

 स्मार्टफोन चार्ज करण्यासाठी ओरिजिनल चार्जर अडॅप्टर आणि केबल वापरा.  सध्याच्या नवीन चार्जर्स मधून मोबाईलला आवश्यक वोल्टेज आणि करंट रेटिंग पाहूनच चार्ज केले जाते. विशेष म्हणजे या चार्जर्समध्ये ऑटोकटऑफ फिचर असतो ज्याने आपला मोबाईल चार्ज झाल्यानंतर चार्जर ऑटोमॅटिक सप्लाय बंद करतो. त्यामुळे आपली बॅटरी जास्त चार्ज होऊन गरम होत नाही आणि ती खराब होण्यापासून वाचते. 

मित्रांनो, जर तुम्ही वर दिलेल्या सर्व सूचनांचे पालन चांगल्या पद्धतीने केले तर आपल्या मोबाईलच्या बॅटरीचा बॅकअप परफॉर्मन्स जास्तीत जास्त दिवस चांगला राहू शकतो. 

मित्रांनो, हि पोस्ट जास्तीत जास्त मोबाईल युजर्सपर्यंत पोहोचवण्यासाठी तुम्हीच आम्हाला मदद करू  शकता. सध्या मोबाईलच्या दिवसेंदिवस किमती वाढत आहेत, आणि मोबाईलची बॅटरी खराब झाल्यावर बाजारामध्ये डुप्लिकेट बॅटरी भेटण्याच्या भीतीने जवळपास प्रत्यके मोबाईल युजर नवीन मोबाईल विकत घेतो. जर हि माहिती जास्तीत जास्त मोबाईल्स युजर्सनि वाचली तर त्यांचे बऱ्यापैकी पैसे वाचू शकतात.

विडिओ पहा : ऑनलाईन कोर्स करण्याचे फायदे 


हेही वाचा -
MSCIT म्हणजे काय? MSCIT Course Details in Marathi

मित्रांनो, तुम्ही अनेकदा एमएससीआयटीबद्दल कुठेतरी ऐकले असेलच. पण तुम्हाला माहित आहे का MSCIT चे पूर्ण रूप काय आहे आणि MSCIT म्हणजे काय? MSCIT कोर्स करण्याचे फायदे काय आहेत?

माहित नसल्यास, काही हरकत नाही, तुम्ही असे पहिले व्यक्ती नाही ज्यांना MSCIT बद्दल माहिती नाही.

या लेखात, मी तुम्हाला एमएससीआयटी अभ्यासक्रमाबद्दल संपूर्ण माहिती देणार आहे, म्हणून हा लेख वाचा कारण तो तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरेल.


Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form