आज आपण ज्या जगात राहत आहे, वावरत आहोत ते आता वेगवेगळ्या संगणकांनी वेढलेले आहे. आपण आता माउसच्या किव्वा कीबोर्डच्या एका क्लिकवर जगभरातील कुठलीही माहिती मिळवू शकतो किंवा पाठवू शकतो. हे फक्त संगणकामुळे शक्य झाले आहे. आज आपण इंटरनेटवर आपला ईमेल तयार करू शकतो, गेम खेळू शकतो, टेलिव्हिजन पाहू शकतो, संगीत ऐकू शकतो, ऑनलाईन घरबसल्या आपल्या ऑफिसची कामे करू शकतो, विडिओ लेक्चर्स पाहू शकतो. अशा असंख्य गोष्टी संगणकामुळे आपण खुप सहजरित्या करू शकतो. मग या संगणकाचा पण काही इतिहास असणार आहे ना! या पोस्टमध्ये आपण संगणकाचा इतिहास(History of Computer in Marathi) आपल्या मातृभाषेत म्हणजेच मराठीमध्ये पाहणार आहोत.
असे म्हटले जाते कि, "गरज हि शोधाची जननी आहे." संगणकाचा इतिहासही असाच आहे. आजकाल आपण पाहत असलेला संगणक सुरुवातीला गणिती क्रिया करण्यासाठी शोधला गेला होता. त्यानंतर काळानुसार शास्त्रज्ञांनी (इंजिनीअर्स) यांनी संगणकामध्ये गरजेनुसार अनेक बदल घडवून आणले. आणि आज आपण त्याचा परिणाम सर्वत्र पाहत आहे.
संगणकाचा संपूर्ण इतिहास । History of Computer in Marathi
चार्ल्स बॅबेज यांना "संगणकाचे जनक" (Father of Computer) म्हटले जाते. चार्ल्स बॅबेज हे एक "गणितीय शास्त्रज्ञ" होते. ते केंब्रिज विद्यापीठात काम करत होते. सन १८३० मध्ये त्यांनी एक उपकरण शोधले. ज्याच्या मदतीने गणिताच्या सगळ्या बेसिक क्रिया करता येत होत्या. या उपकरणास डिफरेन्शियल इंजिन असे नाव देण्यात आले. यात काही बदल करून चार्ल्स बॅबेज यांनी अँनालिटिक्स इंजिन बनवले. ज्याची रचना जवळपास आजच्या संगणकासारखी होती.
या Analytics इंजिनचे पाच मुख्य भाग होते. यातील पहिल्या भागात डेटा(माहिती) साठवली जात असत. दुसऱ्या भागात, त्या डेटावर गणितीय ऑपरेशन्स केले जात. आणि मिळालेले उत्तर तिसऱ्या भागाकडे पाठवले जायचे. तिसऱ्या भागात दुसऱ्या भागाकडून मिळालेला डेटा स्वीकारला जायचा. आणि चौथ्या
भागात डिस्प्लेच्या मदतीने आपल्याला उत्तर दाखवण्याचे यायचे. सर्वात महत्वाच म्हणजे या चारही भागावर लक्ष(नियंत्रण) ठेवण्याचे काम पाचव्या भागात केले जायचे.
चार्ल्स बॅबेज यांनी तयार केलेल्या "अँनालिटिक्स इंजिन" ला आधुनिक संगणकाचे मूळ म्हटले जाते.
त्यानंतर पुढे सन १८८० मध्ये अमेरिकेत जनगणनेचे काम सात वर्ष चाललं होत. त्यावेळी सरकारने एक घोषणा केली कि, " जो कोणी जनगणना करण्यासाठी सोपे तंत्रज्ञान किंवा पद्धत सांगेल, अशा व्यक्तीस सरकारकडून बक्षीस दिले जाईल." त्यावेळेस हरमन होलेरिथने पंच कार्ड पद्धत शोधली. या तंत्रज्ञानाचा वापर करून १८९० मध्ये जनगणना अवघ्या तीन वर्षात पूर्ण झाली.
आयबीएम (IBM) (इंटरनॅशनल बिझनेस मशीन कार्पोरेशन) कंपनीची स्थापना १६ जून १९११ रोजी अँनालिटिक्स इंजिन, डिफरेन्शियल इंजिन, पंच कार्ड टेक्निक सारख्या मशीनच्या नोंदी ठेवण्यासाठी करण्यात आली. या दिवसापासून प्रत्यक्षात संगणकाचे युग सुरु झाले, असे म्हणायला काही हरकत नाही.
सन १९४४ मध्ये हावर्ड एकिनने मार्क I (Mark I) कॉम्प्युटर तयार केला. या संगणकामध्ये ३०० वैक्युम ट्यूब चा वापर करण्यात आला होता. हा पहिला "इलेक्ट्रॉनिक डिजिटल संगणक" आहे . १९४९ मध्ये प्रोफेसर मॉरिस विल्किस यांनी इलेक्ट्रॉनिक डिले स्टोरेज औटोमॅटीक कॅलक्युलेटर - Electronic Delay Storage Automatic Calculator (EDSAC) तयार केले. युनिवर्सल स्वयंचलित संगणक I (UNIVAC - Universal Automatic Computer I) हा डिजिटल संगणक १९५१ मध्ये तयार करण्यात आला.
त्यानंतर संगणकामध्ये खूप सारे बदल होत गेले. १९५२ मध्ये, IBM 701 नावाचा पहिला "व्यापारी संगणक" विक्रीसाठी पहिल्यांदा विक्रीसाठी ठेवला. आणि याच कंपनीने १९५३ मध्ये IBM 650 नावाचे सुमारे १००० संगणक विकले.
पहिला मिनी संगणक (First Mini Computer)
१९६५ मध्ये, पहिला मिनी कॉम्प्युटर डिजिटल इक्विपमेंट कॉर्पोरेशनने विकसित केला. DEC हा लघुसंगणकांचा सर्वात मोठा उत्पादक होता. हे छोटे, स्वस्त आणि कमी जागा घेणारे संगणक होते.
वैयक्तिक संगणक (Personal Computer)
पहिला वैयक्तिक संगणक १९७४मध्ये विकसित करण्यात आला. परंतु १९७७ मध्ये पहिला आणि यशस्वी मायक्रो कॉम्प्युटर पीसी विकसित करण्यात आला. हा संगणक विकसित करण्याचे श्रेय तरुण तंत्रज्ञ स्टीव्ह वोझ्नियाक (Steve Wozniak) यांना जाते.
त्यांनी या संगणकाला Apple-1 असे नाव दिले. सुरुवातीला मोटार गॅरेजमध्ये अँपल-१ संगणक तयार करण्यात आला. पुढील 3 महिन्यांनंतर, वोझ्नियाकने Apple-11 नावाचा नवीन संगणक विकसित करण्यास सुरुवात केली.
१९८१ मध्ये, IBM कंपनीने IBM-PC मालिकेतील संगणकांचे उत्पादन सुरू केले. या संगणकांचे ग्राहकांकडून कौतुकही झाले आणि त्यांना पसंतीही मिळाली.
अशाप्रकारे या पोस्टमध्ये आपण कॉम्प्युटरचा इतिहास(History of Computer in Marathi) पाहिलेला आहे. तुम्हाला आमची पोस्ट कशी वाटली याची प्रतिक्रिया आम्हाला कमेंटद्वारे जरूर कळवा. कॉम्प्युटर बद्दलच्या कोणतीही शंका तुमच्या मनात निर्माण झाली असेल तर ती आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा. तुमच्या शंकेचे उत्तर आम्ही तुम्हांला नक्की देऊ.
Tags
Computer Tips