शेअर बाजार म्हणजे काय ? | What is Share Market in Marathi

स्कॅम 1992 हर्षद मेहता यांच्या जीवनावर आधारित शेअर मार्केट 1992 वेबसिरीज रिलीज झाल्यापासून प्रत्येकाला शेअर मार्केटबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे. अनेकांनी तर त्यांची डीमॅट अकाऊंट(Demat Account) वेगवेगळ्या ब्रोकर्सद्वारे उघडली आहेत. पण मला खात्री आहे की, त्यांतील 80% लोकांना शेअर मार्केट म्हणजे काय याची माहिती पूर्णपणे नाहीये.

शेअर मार्केटला(Share Market)  दुसऱ्या नावाने देखील संबोधले जाते ते म्हणजे स्टॉक मार्केट(Stock Market). हा असा बाजार आहे जिथे अनेक कंपन्यांचे शेअर्स विकले जातात. शेअर बाजाराच्या माध्यमातून आपण आपला पैसा थेट मोठ्या कंपन्यांमध्ये गुंतवू(invest) शकतो. आणि त्या शेअर्सची किंमत वाढताच तो शेअर विकून आपण चांगला नफा मिळवू शकतो.

शेअर मार्केटमध्ये आपण आपला पैसा त्या कंपन्यांमध्ये गुंतवू शकतो, ज्या शेअर मार्केटमध्ये नोंदणीकृत आहेत, म्हणजेच शेअर मार्केटच्या यादीत त्या कंपनीचे नाव असणे आवश्यक आहे.

शेअर बाजार हे असे एक ठिकाण आहे, जिथे माणूस आपले नॉलेज आणि अभ्यास वापरून काही थोडे पैसे स्टॉक मार्केटमध्ये गुंतवून एका दिवसात हजारो, लाखो रुपये कमावू शकतो. पण तुम्हाला हे माहित असलेच पाहिजे की, “एका नाण्याच्या दोन बाजू असतात”. एकाचा परिणाम चांगला असतो तर दुसऱ्याचा परिणाम वाईट. त्याचप्रमाणे, जर आपण शेअर मार्केटमध्ये चांगला नफा कमवू शकतो, तर आपण या शेअर मार्केटमध्ये आपले पैसे देखील बुडवू शकतो.

शेअर मार्केटमध्ये पैसे बुडवायचे नसतील तर किमान शेअर मार्केटचे ज्ञान(Share Market Knowledge) असले पाहिजे. या पोस्टमध्ये आम्ही शेअर मार्केटचे मूलभूत ज्ञान आपल्या मातृभाषेत सांगणार आहोत. चला तर मग शेअर मार्केटची माहिती जाणून घेऊया..

शेअर बाजार म्हणजे काय? What is Share Market in Marathi?

शेअर मार्केट(Share Market) हे एक असा प्लॅटफॉर्म आहे म्हणजेच मार्केट आहे,  जिथे कंपन्यांचे शेअर्स खरेदी आणि विकले जातात. शेअर मार्केटला मराठीमध्ये शेअर बाजार (Share Bazar)  म्हणतात. तर बऱ्याच वेळा शेअर मार्केटला स्टॉक मार्केट सुद्धा म्हटले जाते. शेअर बाजारात लोक कंपन्यांचे शेअर्स विकत घेतात आणि त्या कंपन्यांचे शेअर होल्डर बनतात. आणि शेअरच्या मूल्यातील बदल समजून घेऊन ते शेअर्सची खरेदी-विक्री करून चांगला नफा कमावतात.

शेअर मार्केटमध्ये किती नफा मिळेल ? आपण किती पैसे आणि कोणत्या कंपनीत गुंतवतो यावर ते अवलंबून असते. जर तुम्ही कोणत्याही एका कंपनीत गुंतवणूक केली असेल. ती कंपनी नफ्यात असेल तर तुमचा नफा होईल. जर गुंतवणूक केलेली कंपनी तोट्यात असेल तर तुमचेही नुकसान होऊ शकते. म्हणूनच तुम्हाला शेअर मार्केट शेअर मार्केटचे पूर्ण ज्ञान असणे गरजेचे आहे .

शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवण्यासाठी काही गरजेच्या गोष्टी  

शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवण्यापूर्वी काही पूर्वतयारी असणे आवश्यक आहेत. ज्यामध्ये तुमचे डिमॅट खाते असणे आवश्यक आहे. ज्याच्या मदतीने तुम्ही ट्रेडिंग करू शकता. तुम्ही तुमचे पैसे शेअर मार्केटमध्ये गुंतवू शकता. आता तुमच्या मनात काही प्रश्न निर्माण होऊ लागले असतील. त्यातील पहिला प्रश्न हाच असेल कि हे डिमॅट खाते कसे उघडायचे ?

डिमॅट खाते तयार करणे आजकाल खूप सोपे झाले आहे. Upstox, 5 Paisa, Angel One, Zerodha, OctaFX ट्रेडिंग अँप, IIFL यांसारख्या अँप्सद्वारे तुम्ही तुमचे डिमॅट खाते काही क्षणात तयार करू शकता. या सर्व ट्रेडिंग ऍप्लिकेशन्सपैकी, मी तुम्हाला Upstox आणि Groww हे दोन प्लॅटफॉर्म सुचवेन. कारण मी बऱ्याच दिवसापासून  upstox वापरत आहे. मला या प्लॅटफॉर्म्स चा वापर करताना कुठलाही प्रकारची अडचण आलेली नाही. आणि जरी काही अडचण आली तरी आपल्याला त्यांच्या कस्टमर सपोर्टकडून जलद मदत मिळते.  जर तुम्हाला अपस्टॉक्समध्ये डीमॅट खाते उघडायचे असेल तर तुम्ही आमच्या लिंकचा वापर करून नोंदणी करू शकता. आमच्या लिंकचा वापर केल्यास त्यातून आम्हांला काही रेफेरल अमाऊंट मिळत असते. व आम्हाला अशाच माहितीपूर्ण पोस्ट अपलोड करण्यासाठी प्रेरणाही मिळते. 

Groww App Link : Download Groww App 

Upstox App Link : Download Upstox App 

डिमॅट खाते तयार करण्यासाठी, तुमच्याकडे बँक पासबुक आणि पॅन कार्ड असणे आवश्यक आहे. तसेच तुमचा मोबाईल नंबर आधारशी जोडलेला असावा.

या सर्व आवश्यकता पूर्ण केल्यानंतर, तुमचे डीमॅट खाते उघडले जाईल. त्यानंतर तुम्ही शेअर बाजारात पैसे गुंतवू शकता पण त्याआधी तुम्हाला शेअर बाजार नीट समजून घ्यावा लागेल, त्यानंतरच शेअर मार्केट पैसे गुंतवणे योग्य राहील.

शेअर/स्टॉक मार्केट कसे समजून घ्यावे? 

शेअर मार्केटमध्ये दररोज चढ-उतार(Up & Downs) होत असतात. त्यामुळे तुम्हाला शेअर बाजाराचे विश्लेषण कसे करायचे हे माहित असले पाहिजे. जर तुम्ही शेअर मार्केट ऍनालिसिस (Analysis) करायला शिकलात तर तुमचे नुकसान होण्याची शक्यताही कमी असते.

जर तुम्ही शेअर मार्केटची कुठलीही माहिती नसताना शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवत असाल तर तुमचे नुकसान होण्याची शक्यता जास्त असते. आणि जर तुम्ही शेअर मार्केट बद्दल पूर्ण माहिती घेऊन शेअर बाजारात पैसे गुंतवत असाल तर तुम्हाला चांगला नफा/परतावा मिळू शकतो.

शेअर बाजार समजून घेण्यासाठी तुम्हाला शेअर बाजारात सध्या असलेल्या कंपन्यांच्या कामगिरीचा आलेख(Chart) समजून घ्यावा लागेल. याच्या मदतीने तुम्हाला शेअर्स कधी खरेदी करायचे आणि कधी विकायचे हे कळेल. शेअर बाजार मधील कंपन्यांचा आलेख कसा समजून घ्यायचा? हा प्रश्न आता आपल्यासमोर निर्माण झाला असेल.

स्टॉक मार्केटमध्ये, कोणत्याही स्टॉकचा आलेख पहा, ज्याला चार्ट देखील म्हणतात, मग तो अपट्रेंड (Uptrend) होत आहे कि डाउनट्रेंड (Downtrend) आहे किंवा साईडवे ट्रेंड (Sideway Trend) हे आपल्याला चेक करायचे असते.

अपट्रेंड : याचा अर्थ हायर टॉप हायर बॉटम. हा ट्रेंड आपल्याला संकेत देतो की स्टॉक शिडीसारखा वर येताना दिसत असेल तर त्या ट्रेंड ला अपट्रेंड म्हटले जाते. अशा वेळेस बऱ्याच वेळा स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला जातो.

डाउनट्रेंड: याचा अर्थ लोअर टॉप लोअर बॉटम हा ट्रेंड आपल्याला संकेत देतो की स्टॉक शिडीसारखा खाली जाताना दिसत असेल तर त्या ट्रेंड ला अपट्रेंड म्हटले जाते. अशा वेळेस बऱ्याच वेळा स्टॉक विकण्याचा सल्ला दिला जातो.

साइडवे ट्रेंड: स्टॉकचा हा ट्रेंड अतिशय धोकादायक मानला जातो. यामध्ये,  हा ट्रेंड काही ठराविक श्रेणींमध्येच राहतो. यात ट्रेंडची दिशाही कळत नाही. त्यामुळे साईडवे ट्रेंडमध्ये पैसे बुडण्याची शक्यता जास्त असते. म्हणूनच साईडवे ट्रेंडपासून दूर राहणे चांगले आहे.

प्रत्येक स्टॉकचा अपट्रेंड, डाउनट्रेंड आणि साइडवे ट्रेंड पाहून स्टॉक खरेदी किंवा विक्री करावी.

शेअर बाजारात ट्रेडिंग करण्याच्या पद्धती 

शेअर मार्केटमध्ये दोन प्रकारे ट्रेडिंग होते. इंट्राडे (Intraday) आणि डिलिव्हरी (Delivery).

इंट्राडे (Intraday) : ट्रेडिंगच्या या पद्धतीमध्ये, स्टॉक जास्त काळ होल्ड करून नाही ठेवता येत. यामध्ये, आपल्याला एका दिवसात स्टॉक विकत घ्यावा लागतो आणि त्याच दिवशी बाजार बंद होण्यापूर्वी त्याची विक्री करावी लागते.

डिलिव्हरी (Delivery): ट्रेडिंगच्या या पद्धतीमध्ये, आपण स्टॉक दीर्घकाळ ठेवू शकतो. यामध्ये आपण कधीही शेअर खरेदी आणि विक्री करू शकतो.

आपण इंट्राडे आणि डिलिव्हरी यामधील कोणत्याही एका पद्धतीचा किव्वा दोन्ही पद्धतींचा वापर करून स्टॉक मार्केटमध्ये ट्रेडिंग करू शकतो. 

शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवणे योग्य आहे का ? 

मला या प्रश्नांची दोन उत्तरे द्यायची आहेत.

होय, जर तुम्हाला स्टॉक मार्केटबद्दल चांगले ज्ञान असेल. तर स्टॉक मार्केट पैसे गुंतवण्यासाठी तुमच्यासाठी हे योग्य व्यासपीठ आहे. शेअर बाजारात स्टॉकची खरेदी-विक्री करून तुम्ही नफा कमवू शकता.

नाही, हे दुसरे उत्तर अशा लोकांसाठी आहे ज्यांना शेअर बाजाराचे अजिबात ज्ञान नाही, नॉलेज नाही . तर अशा लोकानी आधी शेअर बाजाराची माहिती घेऊन पाहिजे आणि मग ट्रेडिंग सुरू करायाला काहीच हरकत नाही. जर तुम्ही ज्ञानाशिवाय शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करत असाल तर तुमची पैसे गमावण्याची शक्यता जास्त असेल. पण त्यावर उपायही आहे. असे लोक म्युच्युअल फंडात पैसे गुंतवू शकतात.

या पोस्टमध्ये, आपण आपल्या मातृभाषेत शेअर मार्केटची म्हणजे काय,  शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवण्यासाठी कशाची आवश्यकता आहे याविषयी माहिती मिळाली असेलच.

जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form