मायक्रोसॉफ्ट ऑफिस म्हणजे काय? | What is Microsoft Office in Marathi

मित्रांनो, या पोस्टमध्ये आपण Ms-Office म्हणजेच Microsoft Office (in Marathi) बद्दल जाणून घेणार आहोत. Ms-Office काय आहे? यामध्ये कोणते applications येतात? मायक्रोसॉफ्ट ऑफिसचे फायदे काय आहेत? अशा बऱ्याच  प्रश्नाची उत्तरे तुम्हाला या पोस्टमध्ये मिळतील.
संगणकापूर्वी अनेक कार्यालयीन कामांची कागदपत्रांवर टिप्पणी केली जात असे. संगणकाच्या विकासानंतर हळूहळू अनेक गोष्टी सोप्या होऊ लागल्या. पण मायक्रोसॉफ्ट ऑफिस सुरू झाल्यानंतर ऑफिसच्या कामात आणखी बदल झाले. ऑफिसमधील कामाला आणखी गती मिळाली.

मायक्रोसॉफ्ट ऑफिस म्हणजे काय?


  Ms-Office चे पूर्ण नाव मायक्रोसॉफ्ट ऑफिस आहे. Ms-Office ही ऑफिसमध्ये वापरल्या जाणार्‍या अनेक ऍप्लिकेशन्सची सेटअप फाइल आहे. एमएस ऑफिस 1990 मध्ये मायक्रोसॉफ्ट कॉर्पोरेशनने सुरू केले होते. 

Ms Office हे एक संपूर्ण सॉफ्टवेअर पॅकेज आहे जे प्रत्येक संगणक वापरकर्त्याच्या मूलभूत गरजा ते प्रगत गरजा पूर्ण करते. आणि त्यांना सोपे करते. कार्यालये, घरी, विद्यार्थी साठी आपण सहजरित्या मायक्रोसॉफ्ट ऑफिस वापरू शकतात. गरजेनुसार आजच्या काळात Ms Office च्या विविध आवृत्त्याही(व्हर्जन्स) उपलब्ध आहेत. एमएस ऑफिस हे संगणक वापरकर्त्यांमध्ये सर्वाधिक पसंतीचे सॉफ्टवेअर आहे. नवीन कॉम्प्युटर किंवा लॅपटॉप घेताना आता त्यात एमएस ऑफिस इन्स्टॉल करून दिलेले असते.

 Ms Office मध्ये कोणकोणते प्रोग्रॅम्स मिळतात.? 


आपल्याला Ms Office च्या सॉफ्टवेअर पॅकेजमध्ये जे अॅप्लिकेशन्स मिळतात आणि जे कदाचित तुम्ही याअगोदरही बहुतेक वेळा ते सॉफ्टवेअर्स देखील वापरले असतील. ज्यामध्ये - Word (मायक्रोसॉफ्ट वर्ड), एक्सेल (मायक्रोसॉफ्ट एक्सेल) पॉवरपॉइंट OneNote Outlook, Publisher,  Access. 

चला तर मग या सर्व ऍप्लिकेशन्सबद्दल थोडक्यात जाणून घेऊया. 

 
मायक्रोसॉफ्ट वर्ड वापरून आपण वेगवेगळी कागदपत्रे, फ्लायर्स, रेझ्युमे, प्रमाणपत्रे, अहवाल, माहितीपत्रके तयार करू शकतो.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form