या पद्धतीने आपले सोशल मीडिया अकाउंट हॅकर्सपासून सुरक्षित करा । Protect your social media account from hackers this way

 

लॉकडाऊनमुळे अनेकांना सोशल मीडियाची सवय झाली आहे. लहान मुलापासून ते अगदी वृद्धापर्यंत सर्वजण आता स्मार्टफोनचा वापर करत आहेत. आणि जवळपास यातील बरेच जणांनी कोणत्यातरी एका सोशल मिडियाच्या प्लॅटफॉर्म्सवर आपले रजिस्ट्रेशन केले आहे. सोशल मिडिया युजर्सची संख्या एवढी मोठी असल्याकारणाने  हॅकर्स(Hackers) सोशल मीडिया(Social Media) अकाऊंटला आपले लक्ष्य बनवत आहेत. सध्या सायबर सुरक्षा ही एक मोठी समस्या बनली आहे. दररोज अनेक सोशल मीडिया अकाउंट हॅक होत आहेत.

या तंत्रज्ञानाच्या वाढत्या युगात सोशल मीडिया अकाउंट आणि सायबर क्राईमच्या घटनाही झपाट्याने वाढत आहेत. कधी कधी कुणाच्या खाजगी फोटोचा गैरवापर करून त्यांचे सोशल मीडिया अकाउंट चोरले जाते. तर मोठ्या सेलिब्रिटी, राज्यातील नेत्यांचे सोशल अकाउंट हॅक करून त्यांच्याकडून पैशांची मागणी केली जाते. मग अशा वेळेस आपण आपले सोशल मीडिया अकाउंट कसे सुरक्षित करायचे? हा मोठा प्रश्न प्रत्येक सोशल मिडिया धारकासमोर निर्माण होत असतो. याचेच उत्तर आपण या पोस्टमध्ये जाणून घेणार आहे.

या पद्धतीने आपले सोशल मीडिया अकाउंट हॅकर्सपासून सुरक्षित करा । Protect your social media account from hackers this way 

मजबूत पासवर्ड वापरा (Use Strong Password)

तुमचे सोशल मिडिया खाते सुरक्षित करण्यासाठी पहिली पायरी म्हणजे मजबूत पासवर्ड तयार करणे. तुमचा पासवर्ड कमकुवत असेल तर हॅकर्स तो सहज शोधू शकतात.

मजबूत पासवर्ड कसा बनवायचा - तुम्ही तुमच्या पासवर्डमध्ये कॅपिटल लेटर्स(A-Z), स्मॉल लेटर्स (a-z), संख्या(0-9) आणि चिन्हे(!,@#$%^&*_ इत्यादी) वापरून तयार केल्यास तुमचा पासवर्ड मजबूत होईल.

तुमचा पासवर्ड या गोष्टी वापरू नये - तुमची जन्मतारीख, मोबाईल नंबर, कोणत्याही कागदपत्रांचा नंबर, किंवा वाहन क्रमांक इ.

सतत पासवर्ड बदलत रहा. (Change Password) :

आपल्या सोशल मीडिया खात्याचा पासवर्ड नियमितपणे बदलणे खूप महत्वाचे आहे. हे पासवर्ड दर ६० ते ९० दिवसांनी बदलले पाहिजेत.

टू-स्टेप फॅक्टर ऑथेंटिकेशन वापरा.

सध्या जवळपास सगळ्याच सोशल मीडियाअँप्समध्ये टू स्टेप फॅक्टर ऑथेंटिकेशनचा(Two Factor Authentication) चा पर्याय उपलब्ध आहे. आपण हि सेटिंग आपण वापरत असलेल्या आपल्या सोशल मीडिया अँप्समध्य चालू ठेवली पाहिजे. यामध्ये पासवर्ड व्यतिरिक्त तुम्हाला खाते उघडण्यासाठी आणखी दोन पर्याय मिळतात. ज्यामध्ये तुमच्या मोबाईलवर टेक्स्ट मेसेज किंवा फोन कॉलद्वारे OTP प्राप्त होतो. हे वापरून, तुम्ही तुमच्या सोशल मीडिया खात्यात प्रवेश करू शकता. आजकाल फिंगरप्रिंट सेन्सर आणि व्हॉइस ऑथेंटिकेशनचा वापरही अनेक अँप्लिकेशन्समध्ये केला जात आहे.

मजबूत VPN (व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क) चा वापर करा.

इंटरनेटच्या माध्यमातून तुमचा डेटा चोरण्यासाठी हॅकर्सकडे सर्व पर्याय उपलब्ध आहेत. व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क वापरून, तुम्ही तुमचा IP पत्ता मास्क करून गोपनीयता ठेवू शकता. यामुळे तुमचे खाते सुरक्षित होईल, ज्यामुळे तुम्ही हॅकिंगपासून वाचू शकता. आणि तुम्ही तुमचे सोशल मीडिया खाते सुरक्षित ठेवू शकता.

सोशल मीडिया खात्यांसाठी दुय्यम ई-मेल वापरा.

बहुतेक हॅकर्स लोकांचा डेटा चोरण्यासाठी ईमेलचा वापर करत असतात. एकदा युजरचा ईमेल हॅक झाल्यानंतर हॅकर्स त्या ईमेलशी संबंधित युजरचे सर्व अकाउंट सहज हॅक करू शकतात. म्हणून, सोशल मीडिया अकाउंट सुरक्षित ठेवण्यासाठी किंवा तुमचा वैयक्तिक डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी, दुय्यम ईमेलचा वापर करा.

अज्ञात लिंकवर क्लिक करू नका

कोणत्याही अज्ञात किंवा Shorten लिंकवर क्लिक करू नका. हॅकर्स मालवेअरसारखे व्हायरस वापरून डेटा चोरू शकतात. ज्यामुळे तुमचे खूप नुकसान होऊ शकते.

काळजी घ्या:

  • सोशल मीडिया खाते वापरल्यानंतर, खाते साइन आउट करा.
  • पासवर्ड चोरी टाळण्यासाठी पासवर्ड कधीही कॉपी करू नका.
मित्रांनो, आपली वैयक्तीक माहीती हि सुरक्षित राहणे हे खूप गरजेचे असते. आणि बरेच लोक म्हणजेच हॅकर्स आपली हि वैयक्तिक माहीती ऑनलाईन चोरण्याचा प्रयत्न करत असतात. जर आपल्याला आपली वैयक्तिक माहिती सुरक्षित ठेवायची असेल तर आपल्याला वरील सर्व बाबींचा गंभीर विचार करायला पाहिजे.


Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form