संगणकाविषयी 7 मनोरंजक तथ्ये | 7 Interesting facts about computer in Marathi

 

Computer Facts in Marathi

Computer Facts in Marathi

तंत्रज्ञानाच्या वाढत्या जगात संगणक आता खूप महत्त्वाचा मानला जातो. कोणतेही काम ऑनलाइन करायचे असल्यास ते संगणक आणि इंटरनेटच्या मदतीने पटकन केले जाते. डेटावर प्रोसेसिंग करायचं असो किंवा काही सादरीकरण करायचं, ही सगळी कामं कॉम्प्युटरमुळे करता येतात. या पोस्टमध्ये आपण या संगणकाबद्दल आश्चर्यकारक तथ्ये (Computer Amazing Facts in Marathi) जाणून घेणार आहोत.

संगणकाविषयी 7 मनोरंजक तथ्ये | 7 Intresting facts about computer in Marathi

#Computer Fact in Marathi Fact No. 1

१. पहिल्या इलेक्ट्रॉनिक संगणकाचे नाव ENIAC होते. ENIAC चे पूर्ण रूप आहे-

E – Electronic, N – Numerical, I – Integrator, A – And, C – Computer.

या संगणकाचे वजन सुमारे 30 टन होते. सोप्या भाषेत या संगणकाचे वजन 2 ट्रकच्या वजनाइतके होते. आणि हा संगणक 150 Kwatt पर्यंत वीज वापरत असे. या ENIAC मध्ये सुमारे 18 हजार व्हॅक्यूम ट्यूबचा वापर करण्यात आला होता.

(व्हॅक्यूम ट्यूब - व्हॅक्यूम ट्यूब ही एक काचेची नळी आहे ज्यातून हवा काढून टाकली जाते. आणि त्यातून व्हॅक्यूम तयार होतो. या व्हॅक्यूम ट्यूब स्विच आणि अॅम्प्लिफायर सारखी काम करते.)

यापैकी बर्‍याच व्हॅक्यूम ट्यूब्स रोजच्या रोज खराब होत होत्या. त्यामुळे हा मोठा संगणक अर्ध्याहून अधिक काळ बंद ठेवावा लागला. आणि असे म्हणतात की हा ENIAC संगणक खराब न होता 5 दिवस चालला होता.

#Computer Fact in Marathi Fact No. 2

2. संगणक व्हायरस (Computer Viruses):

व्हायरस कॉम्प्युटर प्रोग्रॅमसारखाच असतो.  हा प्रोग्राम संगणक खराब करण्यासाठी डिझाइन केलेला असतो. जेव्हा हा व्हायरस तुमच्या संगणकावर कार्यान्वित होतो. त्यावेळेस तो स्वतःची पुनरावृत्ती करतो.  पण हा व्हायरस कॉम्प्युटर किंवा लॅपटॉपमध्ये येण्यापासून आपण रोखू शकतो.

या इंटरनेटने जोडलेल्या जाळ्यात जगात व्हायरस पसरवण्याचे अनेक मार्ग आहेत. जसे की ई-मेल, मजकूर संदेश, सोशल मीडिया इत्यादीद्वारे कॉम्प्युटरमध्ये अनेक "व्हायरस वर्म" (Virus Worm)  आहेत. पण यातील एका जुन्या व्हायरसबद्दल मी आपल्याला माहिती देणार आहे.

त्या व्हायरसचे नाव होते ‘आय लव्ह यू’. हा एक ई-मेल व्हायरस होता. या व्हायरसमध्ये तुम्हाला ईमेल यायचे. आणि त्या ईमेलचा विषय ‘आय लव्ह यू’ असा असायचा. आणि खाली एक अटॅचमेंट होती. ज्यामध्ये व्हायरस (संगणक प्रोग्राम) होता. जेव्हा कोणीही या अटॅचमेंटवर क्लिक करायचे, तेव्हा तो प्रोग्राम आपल्या संगणकावर किंवा लॅपटॉपमध्ये आपोआप कार्यान्वित होत होता. आणि तुमच्या कॉम्प्युटर किंवा लॅपटॉपमध्ये जेवढ्या फाइल्स  उपलब्ध असायच्या, त्यांना ओव्हरराईट करत होता. आणि तुमच्या विंडोज अॅड्रेस बुकमधील किंवा मायक्रोसॉफ्ट आउटलुकच्या पत्त्यावरील सर्व ईमेल्सना आपोआप "आय लव्ह यू" नावाचा ईमेल पाठवला जायचा. अशा प्रकारे हा व्हायरस २००० साली खूप पसरला होता.

‘आय लव्ह यू’ नावाचा हा ईमेल व्हायरस २००० साली आला होता.

#Computer Fact in Marathi Fact No. 3

3. हार्डडिस्क  ( First Harddisk):

जर आपण हार्डडिस्कबद्दल बोललो, तर आपल्या मनात पहिली गोष्ट येते ती हार्डडिस्कच्या आकाराबद्दल. हार्डडिस्क म्हणजे किती जीबी किंवा टीबी.

पण तुम्हाला माहीत आहे का? पहिली हार्डडिस्क तयार झाली तेव्हा त्यात फक्त ५ एमबी एवढीच जागा होती. म्हणजे आजच्या युगातील एकच गाणे त्यात साठवले जात होते. आणि ही हार्डडिस्क 1956 मध्ये IBM या कंपनीने तयार केली होती. या हार्डडिस्कचे वजन सुमारे 8 टन एवढे होते. IBM ने बनवलेल्या या हार्ड डिस्कची किंमत त्यावेळेस सुमारे 50 हजार डॉलर्स होती.

संगणकाचा इतिहास काय आहे? हेही वाचा -  https://www.mazimarathi.com/2022/03/history-of-computer-in-hindi.html

#Computer Fact in Marathi Fact No. 4

4. युएसबी पोर्ट (USB Port)

आता आपल्याला कोणतेही बाह्य उपकरण म्हणजेच External Devices संगणकाशी जोडायचेअसेल,  तर ते आपण पोर्टच्या मदतीने कॉम्युटरसोबत सहज शकतो. पण सुरुवातीला वेगवेगळ्या डिव्हाइसेस साठी वेगवेगळ्या आणि मोठ्या आकाराच्या पोर्ट्स चा वापर  केला जात होता. जसे की सीरियल पोर्ट, पॅरलल पोर्ट इ. विविध प्रकारच्या पोर्ट्सच्या उपस्थितीमुळे, बाह्य उपकरणे कनेक्ट करण्यात अनेक समस्या होत्या. त्यामुळेच त्या काळात अनेक कंपन्या एकत्र आल्या आणि या समस्येवर उपाय शोधू लागल्या. आणि यामुळे यूएसबीचा (USB) शोध लागला. यूएसबीचे फुल फॉर्म आहे - युनिव्हर्सल सीरियल बस आहे.  [ USB -Universal Serial Bus ].  यूएसबी एक सोपे आणि स्टॅंडर्ड पोर्ट बनले आहे.

यूएसबीचा शोध एका भारतीयाने लावला होता. 1994 मध्ये, अजय भट्ट नावाच्या इंटेल कर्मचाऱ्याने आणि त्याच्या टीमने मिळून ते केले.

#Computer Fact in Marathi Fact No. 5

५. कीबोर्ड: आपल्या कीबोर्डवरील बटन वर्णमालानुसार का नाहीत?

आपल्या कीबोर्डच्या वरच्या कळांचा नमुना म्हणजेच बटणाचा  पॅटर्न आहे, त्याला QWERTY म्हणतात. या QWERTY कीबोर्डचा शोध ख्रिस्तोफर सोलास यांनी १८६८ मध्ये लावला होता. पूर्वी कॉम्प्युटर नव्हते, त्यावेळेस टाइप करण्यासाठी टाइपरायटरचा वापर केला जात असे. त्याची बटणे पियानोसारखी होती. पूर्वी टाईपरायटर वरील सगळ्या कळा म्हणजेच बटणे वर्णक्रमानुसार लावल्या होत्या. हे टंकलेखन यंत्र एक पॉपेट मेकॅनिकल उपकरण(Poppet Mechanical Device) होते.  त्यात अनेक Mechanical Links वापरण्यात आल्या होत्या. या टंकलेखन यंत्राने टंकलेखन करताना असे काही शब्द होते जे अक्षरानुसार एकत्र येत असत. त्यावेळेस हायस्पीडमध्ये टायपिंग करताना ही अक्षरे एकत्र टाइप केली की टंकलेखन जाम व्हायचे.

या समस्येचे निराकरण करण्यासाठी, क्रिस्टोपर सोलास यांनी ही अक्षरे काढून टाकली. आणि ख्रिस्तोपरने तयार केलेल्या या कीबोर्ड पॅटर्नचे नाव QWERTY Pattern असे पडले. पुढे जाऊन हा पॅटर्न खूप प्रसिद्ध झाला. आणि सर्व टायपरायटर मॅन्युफॅक्चरिंग कंपन्यांनी QWERTY पॅटर्नचे टायपरायटर बनवायला सुरुवात केली.

#Computer Fact in Marathi Fact No. 6

6. इंटरनेटचे वजन: तुम्ही सगळेच इंटरनेट वापरत असाल, पण तुम्हाला माहित आहे का की इंटरनेटचेही वजन असते.

आता तुम्हाला वाटेल की इंटरनेटचे वजन कोणी मोजले आहे, फक्त ते Calculate केले गेले आहे. इंटरनेटवर जेवढ्या वेबसाइट्स, व्हिडिओ, प्रतिमा, फाइल्स इ. ते विद्युतीयरित्या जतन केल्या जातात. आणि हा सर्व डेटा इलेक्ट्रॉन्सच्या स्वरूपात केला जातो. आणि जर तुम्ही सायन्सचे विद्यार्थी असाल तर तुम्हाला माहिती असेलच कि इलेक्ट्रॉन ला असते.  इलेक्ट्रॉन्सचे वजन खूपच कमी असते. जे 9.1 * 10^-31 किलोग्रॅम आहे. शास्त्रज्ञांच्या मते, 50Kb ची प्रतिमा साठवण्यासाठी 800 कोटी इलेक्ट्रॉन्स लागतात. काही शास्त्रज्ञांच्या मते, जर तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये 4GB डेटा जोडला तर तुमच्या मोबाईलचे वजन 0.00000000000000001 gm ने वाढेल.

#Computer Fact in Marathi Fact No. 7

७. प्रोसेसर (Processor):

तुम्हाला माहीत आहे का? कॉम्प्युटर प्रोसेसरमध्ये डायोड्स, ट्रान्झिस्टर आणि रेझिस्टर असतात. इंटेलच्या I7 प्रोसेसरच्या दुसऱ्या पिढीमध्ये 100 कोटी ट्रान्सिस्टर आहेत. ज्याला आपण Microprocessor म्हणतो. संगणकात प्रक्रिया करण्याचे काम संगणकाचा प्रोसेसर करतो.

1971 मध्ये पहिला मायक्रोप्रोसेसरचा शोध लागला. त्या प्रोसेसरचे नाव इंटेल 404 होते. या प्रोसेसरमध्ये सुमारे 2300 ट्रान्झिस्टर होते.

मित्रांनो, या पोस्टमध्ये आपण संगणकाविषयी 7 मनोरंजक तथ्ये  | 7 Interesting facts about computer in Marathi ची माहिती घेतली आहे. हि माहिती तुम्हांला कशी वाटली? हे कमेंट करून जरूर कळवा तसेच या Computer Facts in Marathi ला आपल्या मित्रांसोबतही शेअर करा.

विडिओ पहा : 

🖥️ संगणकाचा संपूर्ण इतिहास मराठीमध्ये... 

🌐 आज असंख्य गोष्टी संगणकामुळे आपण खुप सहजरित्या करू शकतो. मग या संगणकाचा पण काही इतिहास असणार आहे ना! 

💁🏻‍♀️ या पोस्टमध्ये आपण संगणकाचा इतिहास आपल्या मातृभाषेत म्हणजेच मराठीमध्ये आपल्या 🚩 माझी मराठी (Mazi Marathi) वेबसाईटवर पाहणार आहोत...

सविस्तर वाचा -  https://www.mazimarathi.com/2022/03/history-of-computer-in-hindi.html

🎊 प्रत्येकाला कॉम्प्युटरचा इतिहास माहीत असायलाच पाहिजे... त्यामुळे आपल्या प्रियजनांसोबत हि पोस्ट मोठ्या संख्येने शेअर करा...

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form